esakal | राज्यसभेसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'; वाचा कोण-कोण आहे शर्यतीत...
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यसभेसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'; वाचा कोण-कोण आहे शर्यतीत...

राज्यसभेसाठी नेत्यांची 'फिल्डिंग'; वाचा कोण-कोण आहे शर्यतीत...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र त्याआधी विविध पक्षांच्या काही नेत्यांमध्ये चांगलीच शर्यत पहायला मिळत आहे. शिवसेनेच्या नेत्यांमध्येही राज्यसभेसाठी चुरस बघायला मिळत आहे. काही नेत्यांनी यासाठी फिल्डिंग लावल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मोठी बातमी - वाईट बातमी : यावर्षी पगारवाढीची अपेक्षा ठेऊ नका, कारण...

कोण-कोण आहे शर्यतीत :

शिवसेनेचे काही अनुभवी आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाचा सामना करावा लागलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, अनंत गिते हे राज्यसभेसाठी शर्यतीत आहेत.

तर कॉँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ही राज्यसभेसाठी निवडणुकांसाठी इच्छुकता दर्शवली आहे. प्रियंका चतुर्वेदी या पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या मानल्या जातात. त्यामुळे राज्यसभेत प्रियंका यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या जुन्या नेत्यांनाच संधी मिळावी यासाठी पक्षात वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

मोठी बातमी - "७ कोटी रुपये जमा करा, नाहीतर आम्ही शहीद व्हायला तयार"; लष्कर ए तोयबाचा ई-मेल

दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार, ऍडव्होकेट माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे अमर साबळे, रिपाइंचे रामदास आठवले आणि अपक्ष संजय काकडे या सात जणांच्या राज्यसभा सदस्यत्वाची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे. यांत राजकुमार धूत यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शरद पवार यांचं नाव निश्चित झालं आहे. तर भाजपकडून उदयनराजेंचं तिकीटही निश्चित असल्याचं म्हंटल जातंय.

मोठी बातमी - "गुलशन कुमार यांची हत्या होणार हे ठाऊक होतं" राकेश मारियांचा खळबळजनक खुलासा...

राज्यसभेच्या सात जागांबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत. मात्र भाजपनं सातव्या जागेसाठी उमेदवार रिंगणात उतरवला तर या जागेसाठी चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे . त्यामुळे आता राज्यसभेवर कोणाची वर्णी लागते हे बघणं महत्वाचं असणार आहे.    

who will go on rajyasabha check full list of shivsena congress bjp and ncp