मुंबई : नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या सागरी किनारी मार्गा विरोधात आंदोलन सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

मुंबई : नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या सागरी किनारी मार्गा विरोधात आंदोलन सुरु

मुंबई : नरीमन पॉईंट ते वरळी पर्यंतच्या सागरी किनारी मार्गा विरोधात वरळीतील मासेमरांनी आंदोलन सुरु केले आहे.या आंदोलकांवर कारवाई करण्यासाठी या परीसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.त्यामुळे येथील वातावरण चिघळले असून अखेरीस मुंबई शहरचे पालकंमत्री अस्लम शेख यांच्या मध्यस्तीने सोमवार पर्यंत पोलिस कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

सागरी किनारी मार्ग जेथे सागरी सेतुला जोडला जाणार आहे त्या ठिकाणी दोन पिलर मधील अंतर 60 मिटर ठेवणार आहे.हा मार्ग मासेमारी नौका समुद्रात जाण्याचा असून त्यासाठी पिलरमधील अंतर किमान 200 मिटर ठेवण्याची मागणी कोळी समाजाने केली आहे.मात्र,पालिकेने नकार दिला आहे.त्यावरुन स्थानिक मासेमारांनी आंदोलनाची हाक दिली आहे.त्यांना मुंबईतील विविध कोळीवाड्यातूनही पाठींबा मिळत आहे.

हेही वाचा: मुंबई : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

पालिकेने या विरोधात पोलिस संरक्षण वाढवले आहे.त्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आहे.वारंवार पालिके सोबत चर्चा करुनही तोडगा निघत नसल्याने अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने मत्स्यद्योगमंत्री अस्लम शेख यांच्याशी चर्चा केली.शेख यांनी सोमवार पर्यंत कोणतीही कारवाई करु नये असे आदेश प्रशासनाला दिले आहे.सोमवारी बैठक घेऊन यावर तोडगा काढू असे आश्‍वासनही त्यांनी आंदोलन कर्त्यांना दिले आहे.

loading image
go to top