Maharashtra Monsoon: मुंबईसह कोकण जलमय! रायगडात पूरसदृश परिस्थिती; महामार्ग, द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Raigad flood-like situation latest updates: सततच्या मुसळधार पावसाने मुंबई, रायगड, रत्नागिरीत रस्ते, महामार्ग जलमय; वाहतूक विस्कळीत, अनेक भागांत पूरसदृश स्थिती, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत
Pen Ganesh idol workshops flooded

Pen Ganesh idol workshops flooded

sakal

Updated on

मुंबई, रायगड : जवळपास संपूर्ण जून महिना वाट पाहायला लावल्यानंतर मुंबईसह कोकणपट्टीत गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा जोर आजही कायम होता. पावसामुळे मुंबईत अनेक भाग जलमय झाले असून रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. वाकण आणि नागोठणेदरम्याच्या हॉटेल गुलमोहरजवळ कोलाडच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com