

Asiatic Society Elections
ESakal
मुंबई : ‘द एशियाटिक सोसायटी’च्या निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांनी शुक्रवारी (ता. १३) दिलेली स्थगिती उच्च न्यायालयानेही कायम ठेवली. आयुक्तांनी सोसायटीच्या कामकाजाबाबत उपस्थित केलेले गंभीर प्रश्न आणि १४ मार्चच्या निवडणुकीसंदर्भात कोणताही निवडणूक कार्यक्रम न्यायालयासमोर सादर न केल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवीत धर्मादाय आयुक्तांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.