Mumbai : न्यायालयाच्या आदेशानंतर आरेतील १७७ झाडांवर कुऱ्हाड

तोडण्यात येणाऱ्या १७७ झाडांपैकी ५३ झाडांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. तर १२४ झाडे कापण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरे कारशेड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
Mumbai
MumbaiSakal

मुंबई - मुंबईतील आरे कारशेड परिसरातील १७७ झाडे तोडण्यास सुरुवात झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर एमएमआरसीएकडून वृक्षतोड करण्यात येत आहे. पुढील २४ तास वृक्षतोडीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

तोडण्यात येणाऱ्या १७७ झाडांपैकी ५३ झाडांचे प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. तर १२४ झाडे कापण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आरे कारशेड परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Mumbai
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा; वांद्रे स्थानकात सिग्नल बिघाड

"आम्हाला पोलिसांनी नोटीस नाही दिली मात्र आमच्यातील तरबेज अली याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संपूर्ण क्षेत्रात पोलीस बंदोबस्त आहे. यांनी पुनररोपन केलेल्या १०० झाडांपैकी 90 झाडं मरून गेली. ती अत्यंत खर्चिक आणि काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे. न्यायालयानेही आरेच्या विनाशाचे दरवाजे उघडले याचे आम्हाला दुःख आहे.

आम्हाला 2019 ला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला. या वृक्षतोडीला परवानगी नाकारली होती. त्यांनंतर आम्ही सातत्याने आरे जंगल घोषित करून संरक्षित करावं यासाठी प्रयत्न केले. मात्र दरवेळी आम्हाची याचिका फेटाळली गेली.

मात्र त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं गेलं झाडं कापणार नाही तुम्हाला संरक्षण आहे, असे असताना अचानक 2023ला झाड तोडण्याची परवानगी देण्यात आली. आमच्यासोबत अन्याय झाला ", अशी भूमिका वनशक्ती सामाजिक संस्थचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com