
Mumbai: बेस्ट बस अपघाताचे सत्र काही संपायचे नाव घेत नाही. आज भायखळा पुलाजवळून जात असताना एसी बसचे छत घासल्याने बसमधून धूर आला. बसचालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवून अग्निरोधक यंत्रणा वापरल्याने आगीची दुर्घटना टळली.
अपघातग्रस्त बस ही मुंबई सेंट्रल आगारातील मार्ग क्रमांक ए १२६ वर धावणारी असून, ओलेक्ट्रा या कंपनीची कंत्राटी बस असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिली आहे.