Mumbai Rain News : झाडं रस्त्यावर पडल्यानं बेस्टचा खोळंबा, डझनभर मार्ग बदलले; प्रवाशांचे प्रचंड हाल

Mumbai BEST Bus: मुंबईत मुसळधार पावसामुळे 'बेस्ट' बस सेवेला मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत.
Mumbai BEST Bus Traffic change

Mumbai BEST Bus Traffic change

ESakal

Updated on

​मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या 'बेस्ट' बस सेवेला मोठा फटका बसला आहे. शहरातील विविध भागांत झाडे उन्मळून पडल्यामुळे आणि रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे बेस्ट प्रशासनाने अनेक प्रमुख मार्गांतील बसेस इतर मार्गांवर वळवल्या (डायव्हर्ट) आहेत. तर काही ठिकाणी एकेरी मार्गिकेतून वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. ५ जुलै २०२६ रोजी दुपारपर्यंतच्या बेस्ट वाहतूक नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार वाहतुकीत अनेक बदल करण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com