esakal | मुंबई : बेस्टही उभारणार ५५ चार्जिंग स्टेशन
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : बेस्टही उभारणार ५५ चार्जिंग स्टेशन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बेस्टच्या ताफ्यातून डिझेल आणि नैसर्गिक वायूवरील बस हद्दपार करून भविष्यात इलेक्ट्रिक बसगाड्या ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यासाठी पुढील तीन ते चार महिन्यात शहरातील ५५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन तयार केले जाणार आहे.

याठिकाणी खासगी वाहनेही चार्ज करण्याची परवानगी भविष्यात दिली जाणार असून त्यातून बेस्टला उत्पन्न मिळवण्याचा नवा मार्गही उपलब्ध होणार आहे. मुंबई वातावरण कृती आराखड्यानुसार बेस्ट आता केवळ इलेक्ट्रिक वाहनेच ताफ्यात दाखल करणार आहे. भविष्यात १० हजार इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यासाठी येत्या तीन ते चार महिन्यात ५५ ठिकाणी चार्जिंग स्टेशन तयार करण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले. बेस्टच्या ताफ्यात सध्या सहा इलेक्ट्रिक बस आहेत, तर २०२३ पर्यंत एक हजार ९०० इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल होणार आहेत. शिवाय २०२८ पर्यंत सर्व बसगाड्या इलेक्ट्रिक असतील, असा आराखडा बेस्टने तयार केला आहे.

हेही वाचा: मुंबई-ठाण्याला पावसाने झोडपले; वादळी वाऱ्यांसह मुसळधारेचा इशारा

थांब्यांवरही चार्जिंग

बेस्टचे मुंबई २६ डेपो असून सहा हजार थांबे आहेत. या डेपोसह पहिल्या टप्प्यात महत्त्वाच्या थांब्यांवर चार्जिंग स्टेशन उभारण्याचा विचार आहे. टप्प्याटप्प्याने ही संख्या वाढविण्यात येणार आहे.

loading image
go to top