महिलेला व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल करणारा ब्लॅकमेलर अटकेत; दुसऱ्याचा शोध सुरू

आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपद्वारे महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याप्रकरणी रोजी मुंबईतील ओशिवरा येथे एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
Crime News
Crime Newsesakal
Summary

आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपद्वारे महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याप्रकरणी रोजी मुंबईतील ओशिवरा येथे एका व्यक्तीला अटक करण्यात आली.

मुंबई - आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपद्वारे महिलेला ब्लॅकमेल करून तिच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याप्रकरणी सोमवारी 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतील ओशिवरा येथे एका व्यक्तीला अटक करण्यात आली. याच प्रकरणात दुसऱ्या आरोपीचा शोध ओशिवरा पोलीस घेत आहेत.पीडित महिला 24 वर्षांची असून ती एका खाजगी कंपनीत नोकरीत कार्यरत आहे. महिला एका चांगल्या कुटुंबातील असून आरोपीचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

आरोपींला पीडित महिलेची एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप हाती लागली. हाती लागलेल्या व्हिडिओ क्लिपचा शस्त्रासारखा वापर करत आरोपींनी महिलेला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रसारित न करण्यासाठी आरोपींनी पिडीत महिलेकडून पैसे मागायला सुरुवात केली. आरोपी एका व्हिडिओ क्लिपमध्ये कथितपणे पैशाची मागणी करताना दिसतो.

महिलेच्या तक्रारीच्या आधारे, ओशिवरा पोलिस ठाण्यात आरोपिविरोधात भारतीय दंड संहिता कलम 385 , 387 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात एक आरोपी अटकेत असून आणखी एकाचा शोध सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com