Crime News : 53 वर्षीय समलिंगी व्यक्तीशी संबंध ठेवून ब्लॅकमेलिंग; आरोपी अटकेत

53 वर्षीय समलिंगी व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्याचे नग्न छायाचित्र, चॅट आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 25 लाख रुपये उकळले.
Crime News
Crime Newsesakal
Summary

53 वर्षीय समलिंगी व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्याचे नग्न छायाचित्र, चॅट आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 25 लाख रुपये उकळले.

मुंबई - दक्षिण मुंबईतील 53 वर्षीय समलिंगी व्यक्तीला ब्लॅकमेल करून त्याचे नग्न छायाचित्र, चॅट आणि व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून 25 लाख रुपये उकळल्याप्रकरणी गुरूवारी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपीचे नाव दीपक कोळी असे आहे. या प्रकरणात आरोपीला साथ देणाऱ्या त्याच्या दोन साथीदारांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे. सूरज ईशी, दीपक कोळी आणि योगेश जाधव अशी आरोपींची नावे आहेत.

एमआरए मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यावसायिकाची इंस्टाग्रामवर तीन आरोपींपैकी एकाशी सूरज ईशीशी मैत्री झाली. कालांतराने मैत्री वाढत जाऊन अनैतिक नात्यात परिवर्तित झाली. काही दिवसांपूर्वी पिडीत व्यक्तीने आरोपी सोबत दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये दोन दिवस घालवले. तेव्हा आरोपीने पिडीत व्यक्तीचे अश्लील फोटो काढले होते आणि नंतर त्या फोटोंचा वापर करून त्याला ब्लॅकमेल केले. आरोपीने त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने वर्षभरात व्यावसायिकाकडून लाखों रुपये वसूल केले.

आरोपी अधिक पैशांची मागणी करत असल्याने पिडीत व्यक्तीने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी बुधवारी रात्री गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. त्यानंतर सापळा रचत तिघांपैकी एक आरोपी गुरूवारी दीपक कोळी पिडीत व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी पाठवले तेव्हा त्याला पोलिसांनी पकडले.

दीपक कोळी आणि योगेश जाधव यांनी ईशीला गुन्हा करण्यासाठी मदत केली. तक्रारदाराकडून खंडणीचे पैसे घेण्यासाठी त्यांच्या बँक खात्यांचाही वापर करण्यात आला असल्याची पोलिसांची माहिती आहे. पोलीस या प्रकरणातील इतर दोन आरोपींचा शोध घेत त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आरोपी सूरज ईशीचा गुन्हेगारी इतिहास असून यापूर्वी काही चोरी आणि खंडणीच्या गुन्ह्यात त्याचे नाव असल्याची माहिती मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com