मुंबई : लालबाग मध्ये १५५ जणांचे रक्तदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : लालबाग मध्ये १५५ जणांचे रक्तदान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वाडिया रुग्णालयाच्या मदतीने मुंबई नागरिक परिवाराकडून रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात १५५ नागरिकांनी रक्तदान केले. दिवाळीत गावी गेलेल्या नागरिकांमुळे दिवाळीनंतर दरवर्षी रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे हे रक्तदान शिबीर घेण्यात येते. या शिबीराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

वाडिया रुग्णालयाच्या मदतीने मुंबई नागरिक परिवाराकडून १३ वर्षांपूर्वी हे रक्तदान शिबीर सुरू करण्यात आले होते. १३ वर्षांनंतरही दरवर्षी दिवाळीनंतर हे शिबीर मुंबई नागरिक परिवाराकडून घेतले जाते. यावर्षीदेखील झुंज प्रतिष्ठान सेवाभावी संस्था, मुंबई नागरिक सहकारी पतसंस्था, जेरबाई वाडिया हॉस्पिटल यांची मदत घेऊन रविवारी रक्तदानाचे आयोजन केले.

हेही वाचा: मुंबई : पोंढेपाडा येथील माता मृत्यूची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून चौकशी

लालबाग येथील ललित कला भवन येथील कामगार कल्याण केंद्रात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला सकाळी ९ वाजता सुरुवात झाली आणि दुपारी ३ वाजेपर्यंत या रक्तदान शिबिरात १५५ हून अधिक नागरिकांनी रक्तदान केले, अशी माहिती उपाध्यक्ष आशिष भालेराव यांनी दिली.

loading image
go to top