अखेर मुंबईकरांचा घसा होणार ओला, मुंबई मनपा आयुक्तांनी दिला ग्रीन सिग्नल 

अखेर मुंबईकरांचा घसा होणार ओला, मुंबई मनपा आयुक्तांनी दिला ग्रीन सिग्नल 

मुंबई : मुंबईतील कंटेन्मेंट झोन वगळून मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मुंबई मध्ये घरपोच मद्य विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शनिवार पासून ही घरपोच सेवा देण्याची मुभा विक्रेत्यांना देण्यात आली असून नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी मद्याची दुकाने मात्र बंदच राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे. 

राज्य शासनाने घोषित केलेल्या चौथा लॉकडाऊन मध्ये कंटेन्मेंट क्षेत्रात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे कंटन्मेंट झोन वगळता मद्याची घरपोच विक्री करता येणार आहे.

यापूर्वी मद्य विक्रीची परवानगी दिल्यानंतर मुंबई, ठाणे, चेंबूर परिसरात तळीरामांची दरडी झाली होती. त्यामुळे मुंबईतील मद्य दुकाने सुरू केल्यानंतर बंद करण्यात आले होते. आताही दारूची दुकानं, काउंटरवरून मिळणाऱ्या दारूसाठी बंदच राहतील, पण ऑर्डर नोंदवून घरी मागवता येणार आहे.

काही  महत्त्वाच्या बातम्या : 

mumbai bmc commissioner gave green signal for home delivery of liquor sale




 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com