Lockdown : 2 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर 'एसटी' धावली खरी, पण...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने एसटी सेवा बंद होती. या दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारपासून अटी शर्तीवर एसटी बस रस्त्यावर धावली.

अलिबाग : लॉकडाऊनमुळे गेली दोन महिने एसटी सेवा बंद होती. या दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारपासून अटी शर्तीवर एसटी बस रस्त्यावर धावली. मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे नियोजित फेऱ्यांपेक्षा फक्त 70 फेऱ्याच सोडण्यात आल्या.

महत्वाची बातमी कोरोनाबद्दल सर्वात मोठी अपडेट - लक्षणं नसलेल्या रुग्णांबद्दल झालाय मोठा खुलासा

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यापासून आरोग्य, पोलिस आदी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे रायगडची एसटी बस सेवा 12 कोटीहून अधिक तोटयात गेली आहे. 60 दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अखेर अटी शर्तीवर एसटी सेवा सुरु करण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला. जिल्ह्यातील अलिबाग आगारातून 36, महाड आगारातून 44, पेण आगारातून 46, कर्जत आगारातून 14, रोहा आगारातून 68, मुरुड आगारातून 24, माणगाव आगारातून 28 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले होते. 

मोठी बातमी लॉकडाऊन 4.0: मुंबईत आजपासून काय सुरु होणार?

सामाजिक अंतर राखून प्रवाशांनी एसटीमध्ये बसणे, ज्येष्ठ नागरिक तसेच 10 वर्षाखालील मुलांना एसटी प्रवासाला बंदी करणे, बसमध्ये बसण्यापूर्वी मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणे, तसेच सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे अशा अटी शर्तीवर एसटी बस सेवा सुरु करण्यात आली. प्रवाशांच्या संख्येचा आढावा घेऊन मुख्य मार्गावरूनच एसटी बस सोडण्यात आली. त्यात अलिबाग आगारातून सकाळी पावणेनऊ वाजता अलिबाग - पेण, मुरुड आगारातून मुरुड - अलिबाग, पेण आगारातून पेण - पाली, अशा बसेस सोडण्यात आल्या. पहिल्या दिवशी नियोजित फेऱ्यांपेक्षा फक्त 70 फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.

महत्वाची बातमीसावधान..! मुंबईत "या" वयोगटातील कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक

अटी व शर्तीवर एसटी बसेस सुरु करण्यात आल्या आहेत. एसटी बस निर्जूंतकीकरण करून बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांचे हात सॅनिटायझरने स्वच्छ करण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच प्रत्येक बसमध्ये फक्त 22 प्रवाशांना बसण्याची सोय केली आहे.
अनघा बारटक्के, विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, रायगड विभाग

ST ran in Raigad Less response from passengers, less number of rounds than planned


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST ran in Raigad Less response from passengers, less number of rounds than planned