

BMC
ESakal
मुंबई : पालिकेकडून होणाऱ्या ४२६ घरांच्या लॉटरीसाठी १४ नोव्हेंबर या अंतिम मुदतीपर्यंत २,०३७ जणांनी अर्ज भरले आहेत. हे अर्जदार येत्या २० नोव्हेंबरला काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी पात्र असणार आहेत. अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे असून, अर्जदारांचा मरोळ-अंधेरी, गोरेगाव, कांदिवली येथील घरांसाठी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या घरांची किंमत ५९ लाख ते ७८ लाखांपर्यंत आहे. भायखळा येथील कोटींच्या घरांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे.