Vaccination
Vaccination

मुंबई: लसीकरणासाठी जागतिक निविदा; चीनला मात्र बंदी

18 मे पर्यंत निवीदा भरण्याची मुदत

मुंबई: कोविड लशीचे एक कोटी डोस विकत घेण्यासाठी महानगर पालिकेने जागतिक निविदा जाहीर केल्या आहेत. 18 मे पर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख असून संबंधित कंपनीला लस पुरवठा करण्याचे आदेश मिळाल्यानंतर तीन आठवड्याच्या आत पुरवठा सुरु करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जून महिन्यात मुंबईतील लसीकरणाला वेग येणार आहे. 20 रुग्णालये आणि 240 केंद्रात संबंधित कंपनीला थेट पुरवठा करायचा आहे. मात्र चीन आणि भारताच्या सीमारेषांना लागून असलेल्या कोणत्याही राष्ट्रांतील कंपन्यांना या जागतिक निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

Vaccination
देवेंद्र फडणवीसांनंतर अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मर्यादित पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा गोंधळ उडाला आहे.कोविडची तीसरी लाट येण्यापुर्वी मुंबईतील अजून 53 लाख नागरीकांचे दोन डोस पूर्ण गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यासाठी महानगर पालिकेने जागतिक स्तरावरुन लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसात महानगर पालिकेने या निविदा बुधवारी जाहीर केल्या. 18 मे पर्यंत या निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर निविदांची पडताळणी करुन निवडलेल्या कंपनीला लस पुरविण्याबाबत आदेश देण्यात येणार आहे. हे आदेश मिळाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आता लसीकरण केंद्रांपर्यंत लस पुरविण्याची जबाबदारी संबंधित कंपनीची आहे. मुदतीत पुरवठा न झाल्यास अथवा मध्येच पुरवठा थांबल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महानगर पालिकेने घेतला आहे, असे या निविदा पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

Vaccination
विरारमधल्या गायब झालेल्या आजोबांचं अखेर गूढ उकललं...

‘कोविड लसींच्या खरेदीसाठी निवीदा प्रसिध्द करण्यात आले आहेत, असे अतिरीक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले. तसेच,सरकारी प्रयोग शाळेत लशीची तपासणी केल्यानंतर पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. परदेशातील कंपन्यांकडून लस खरेदी करण्यात येणार असली तरी त्यांना भारतीय आयुर्विज्ञान परिषद, केंद्रीय औषध नियंत्रक यांची परवानगी असणे तसेच निकषांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. तसेच, अमेरिकन औषध प्रशासन तसेच समकक्ष प्राधिकरणाची मंजुरी असणे बंधनकार आहे.असेही या निवीदा प्रकि्रयेत समाविष्ठ करण्यात आले आहे.त्याच बरोबर लशींचा पुरवठा करण्यापुर्वी चाचणी बाबतची सर्व माहिती सादर करणे बंधनकारक आहे.

(संपादन- विराज भागवत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com