

BMC Mayor History From Non Marathi To Marathi Leadership
Esakal
बृहन्मुंबई महापालिकेत १९३१ मध्ये ठराव करून अध्यक्षपदाचे नामकरण महापौर करण्यात आले. त्यानंतर मागील ९४ वर्षांमध्ये ३५ अमराठी महापौरांनी मुंबईचे नेतृत्व केले. १९७२ मध्ये मराठीला ही महापालिकेच्या प्रशासकीय भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढे २०२२ पर्यंत सात अमराठी महापौर झाले आणि ते सर्व काँग्रेसचे होते. त्यात आर. के. गणात्रा, बी. के. बोमन बेहराम, एन. डी. मेहता, मुरली देवरा, ए. यू. मेमन, एम. एच. बेदी, आर. आर. सिंह यांचा समावेश होता.