esakal | सावधान!!! नियम मोडल्यास थेट सोसायटीलाच बसणार दंड; वाचा नवी नियमावली
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान!!! नियम मोडल्यास थेट सोसायटीलाच बसणार दंड; वाचा नवी नियमावली

मुंबईत ३० एप्रिलपर्यंत दिवसा जमावबंदी, BMCने जाहीर केले नवी नियम 

सावधान!!! नियम मोडल्यास थेट सोसायटीलाच बसणार दंड; वाचा नवी नियमावली

sakal_logo
By
विराज भागवत

राज्य सरकारने 'ब्रेक द चैन' मोहीम हाती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली असून महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी परिपत्रक काढलं आहे. या परिपत्रकानुसार सार्वजनिक ठिकाणी रात्रीची बंदी करण्यात आली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनासंबंधी नियम मोडल्यास थेट एखाद्या सोसायटीला दंड ठोठवण्यात येणार आहे. ५ पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत 'मिनी कंटेन्मेंट' म्हणून घोषित केली जाणार आहे. तसा फलक बाहेर लावणार येणार असून बाहेरच्या लोकांना सोसायटीत प्रवेश बंदी केली जाणार आहे. मायक्रो कंटेनमेंट झोनमध्येमधील सोसायट्यांना सर्व निर्बंध आणि नियंत्रण ठेवावं लागणार आहे. कंटेंमेंट झोनमधील इमारतीतून नियम मोडल्यास सोसायटीकडून पहिल्या वेळी 10 हजार तर त्यानंतर नियम मोडल्यास 20 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक सील केलेल्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

होम क्वारंटाइन रूग्णांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा नवा निर्णय

३० एप्रिलपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत जमावबंदी, तर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत नागरिकांनी कोणत्याही योग्य करणासह सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत आरोग्य सेवा, मेडिकल आणि इतर अत्यावश्यक सेवा असलेली आस्थापने आणि दुकाने सुरु राहतील. तर इतर सर्व दुकाने, मंदिरे मॉल, चित्रपटगृहे, जिम, मॉल, शाळा बंद राहतील. याशिवाय बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.

आतापर्यंत महाराष्ट्रात किती लोकांना मिळाली लस? शासनाने दिलं उत्तर

अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वाहतूक सुरु- किराणा, औषध, भाजीपाला या जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे. सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातला नसेल तर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत आणि प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.

"दोन दिवसांचा लॉकडाउन असल्याने मी सहमती दिली, पण..."

खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम'- खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील. शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती ५० टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.

'शिवभोजन थाळी'ही आता मिळणार पार्सल, जाणून घ्या किंमत

सिनेमागृहे, नाट्यगृहे, सलून्स, मंदिरे बंदच- मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील. सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या  कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे. प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद राहतील.

शाळा- महाविद्यालये बंद- शाळा, कॉलेजेस बंदच राहतील. १० वी १२ वीच्या परीक्षांचा यास अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.

loading image