Mumbai Bomb Threat
esakal
मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहात मुंबईकर रंगलेले असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईला बॉम्बस्फोट (Mumbai Bomb Threat) करून उडवून देण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. ही कारवाई उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये करण्यात आली असून, आरोपीला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) ताब्यात देण्यात आले आहे.