Mumbai Breaking: मेट्रोसाठी खोदलेल्या खड्यात पडून 6 वर्षाच्या पुतण्याचा मृत्यू; धक्का सहन न झाल्याने काकाने रेल्वेसमोर उडी मारली

गोष्टीचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या काकांनी म्हणजेच शैलेश शेगोकार यांनी ट्रेन खाली येऊन सायंकाळीच आपले जिवन संपवले |
Mumbai Breaking
Mumbai Breakingsakal

मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रविवारी दुपारी अतिशय दुःखद घटना घडली. मेट्रोच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात बुडून सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. आयुष राजेश सेगोकार (वय ६) असे मृत मुलाचे नाव. (Name of deceased child is Ayush Rajesh Segokar)

आयुष आपल्या मित्रांसोबत रविवारी दुपारी बाराच्या सुमारास मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोनच्या बाजूला खेळायला गेला होता. तिथे जवळच मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी आठ ते नऊ फुटांचा खोल खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. (platform number two Mankhurd railway station)

Mumbai Breaking
Navi Mumbai Crime: बेकायदेशीर वास्तव्य; १२ परदेशी नागरिकांची धरपकड, मूळ देशात पाठविण्याची कार्यवाही सुरू

मात्र या गोष्टीचा धक्का सहन न झाल्याने त्याच्या काकांनी म्हणजेच शैलेश शेगोकार यांनी ट्रेन खाली येऊन सायंकाळीच आपले जिवन संपवले. घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Mumbai Breaking
Mumbai News: दीड हजार किलो संशयित गोमांस जप्त; वाचा कशी केली पोलिसांनी कारवाई

चेंबूर आणि गोवंडी दरम्यान शैलेश यांनी लोकल ट्रेन खाली उडी घेऊन रविवारी सायंकाळी आपले जीवन संपवले. आयुष हा त्याच्या चुलत्याकडे म्हणजेच काकांकडे राहात होता. आयुषच्या दुर्दैवी मृत्यूमुळे शैलेश यांना मोठा धक्का बसला आणि या धक्क्यातून न सावरता आल्यामुळे त्यांनी आपले जीवन संपवले असे म्हटले जात आहे.(Shailesh ended his life on Sunday evening by jumping unde a local train)

Mumbai Breaking
Navi Mumbai News: या कारणावरुन मेट्रो स्थानकावर प्रवासी होत आहेत हैराण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com