

Mumbai Court Clerk Arrested for Taking Bribe Judge Connected via Call
Esakal
माझगाव इथं दिवाणी सत्र न्यायालयातल्या लिपिकाला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलीय. यानंतर लिपिकानं अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना कॉल केला आणि लाचेची रक्कम स्वीकारू का विचारलं, त्यावर न्यायाधीशांनी संमती दर्शवली. यामुळे आता लिपिकासह न्यायाधीशांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लिपिकासह न्यायाधीश लाच प्रकरणी जाळ्यात अडकल्यानं खळबळ उडाली आहे.