Mumbai Bridge Heist : बिहारनंतर आता मुंबई! ६००० किलोंचा ९० फूट लांब लोखंडी पूल गेला चोरीला; चौघांना अटक

अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचा हा पूल होता.
Mumbai Bridge Heist
Mumbai Bridge HeisteSakal
Updated on

मुंबई : काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये एक पूल चोरीला गेल्याची घटना घडली होती. मात्र, आता मुंबईच्या मालाडमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटीचा एक ९० फूट लांब लोखंडी पूल चोरट्यांनी पळवून नेला. मालाडच्या ब्लॅक रोड परिसरातील एका नाल्यावर हा पूल ठेवण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका टोळीने लोखंडाचा हा पूल कटरच्या सहाय्याने कट करून चोरून नेला. गेल्या महिन्यात घडलेली ही चोरी आता समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे.

Mumbai Bridge Heist
अजब चोरी! घरात घुसलेल्या चोरांना महिलेनं पैसे देण्यास दिला नकार म्हणून घरातून पळवली परवानाधारक बंदूक

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी जून महिन्यात अदानी इलेक्ट्रिसिटीने हा तात्पुरत्या स्वरुपाचा पुल या नाल्यावर उभारला होता. यानंतर यावर्षीच्या एप्रिल महिन्यात याठिकाणी एक कायमस्वरुपी पूल बांधला गेला. यामुळे जुना तात्पुरता पूल क्रेनच्या सहाय्याने काढून ठेवण्यात आला होता.

यानंतर २६ जून रोजी अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे काही अधिकारी जुन्या पुलाची पाहणी करायला गेले, तर तिथे पूलच नसल्याचं त्यांना समजलं. यानंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. ६००० किलो वजनाच्या या पुलाची किंमत २ लाख रुपये होती.

Mumbai Bridge Heist
अजब चोरट्यांचा अजब कारभार! खिशातील पैसे संपल्यानंतरच करायचे चोरी; इतरवेळी इमानदारी 

सीसीटीव्हीने समजलं सत्य

पोलिसांनी याप्रकरणी तपास करताना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेतली. यामध्ये असं दिसून आलं, की गॅस कटरच्या मदतीने हा पूल हळू-हळू कट करण्यात आला. यानंतर चोरांनी हे पुलाचे तुकडे पळवून नेले.

चोरांमध्ये कंपनीचा कर्मचारी

पोलिसांनी सांगितले, की अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये एक व्यक्ती त्याच कंपनीचा कर्मचारी आहे, जिला अदानी इलेक्ट्रिसिटीने पूल बनवण्याचं कंत्राट दिलं होतं. पोलिसांनी चोरी झालेला पूल आणि सामान जप्त केलं असल्याची माहिती अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या प्रवक्त्याने दिली.

Mumbai Bridge Heist
‘अजब चोरो की गजब कहानी’; चोरी करता करता स्वतःला केले खोलीत बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.