Mumbai Student Ends Life Before Leaving for London StudiesEsakal
मुंबई
Mumbai : शिकायला लंडनला जायचं होतं, त्याआधीच बिझनेसमनच्या १७ वर्षीय लेकीनं संपवलं आयुष्य; २३ मजली इमारतीवरून मारली उडी
Mumbai News : ओबेरॉय संकुल परिसरात गेल्या सहा महिन्यात घडलेली ही चौथी घटना आहे. अल्पवयीन मुलगी ही मुंबईत एका नामांकित महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत.
मुंबईत गोरेगावमधील ओबेरॉय संकुलात एका १७ वर्षांच्या मुलीनं २३ व्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी ही घटना घडली. ओबेरॉय संकुल परिसरात गेल्या सहा महिन्यात घडलेली ही चौथी घटना आहे. अल्पवयीन मुलगी ही मुंबईत एका नामांकित महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घरात कुणी नसताना तरुणीनं उडी मारली.

