

Dead Cats Found in Chembur
ESakal
मुंबई : मुंबईत एक 'कॅट किलर' फिरत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील चेंबूर येथे गेल्या काही दिवसांत अनेक मांजरीचे छिन्नविछिन्न मृतदेह आढळले आहेत. आतापर्यंत तब्बल २० हून अधिक मांजरींची निर्घृणपणे हत्या करून त्यांचे मृतदेह फेकून दिल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.