mumbai central ST bus Dewatering of depot started Inspection of drainage cm eknath shinde
mumbai central ST bus Dewatering of depot started Inspection of drainage cm eknath shinde sakal

Mumbai News : डेपोतील पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू; वर्षानुवर्षांपासून बुजलेल्या ड्रेनेजची पाहणी

सकाळच्या वृत्तानंतर एसटी प्रशासनाला आली जाग

मुंबई : मुंबई सेंट्रल एसटी बस स्थानकावरील खड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामूळे एसटी प्रवाशांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. तर मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेल्या स्वच्छ सुंदर बस स्थानकांच्या योजनेचा बोजवारा उडाल्याचे चित्र सकाळ ने गुरूवारी मांडले होते.

त्यानंतर एसटी महामंडळाच्या बांधकाम विभागाला जाग आली असून, डेपो परिसरात साचलेल्या पाण्याची पाहणी करून डेपो परिसरात जमा झालेले पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे.

मुंबई सेंट्रलच्या डेपो मॅनेजर गेल्या दिड महिन्यांपासून रजेवर असल्याचे सांगण्यात आले आहे. परिणामी मुख्यालयाला लागून असलेल्या डेपोच्या व्यवस्थापनाकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.

mumbai central ST bus Dewatering of depot started Inspection of drainage cm eknath shinde
Mumbai Traffic Update : पावसामुळे मुंबईकरांची दैना! पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

डेपो परीसरात असलेल्या खड्यांना चार लाख रूपये खर्चुन बुजवण्याचे काम करण्यात आले असल्याचे दावा एसटीच्या बांधकाम विभागाकडून केला जात आहे. मात्र, त्यानंतरही डेपो परिसरात पाणी साचत असल्याचे चित्र दिसून आले आहे.

मात्र, काँक्रीटीकरण केल्यानंतर डेपोतील परिसर सपाट नसल्याने पाणी त्यावर साचून राहत असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे.

mumbai central ST bus Dewatering of depot started Inspection of drainage cm eknath shinde
Mumbai : हातात पिस्तुल घेऊन परिसरात फिरत असतानाच ; दुसऱ्या हातात पडल्या पोलिसांच्या बेड्या

एसटी डेपो परिसरात पाण्याचा निचरा करण्याचे काम गुरूवार पासूनच सुरू केले आहे. ड्रेनेज सुद्धा उघडण्यात आले असून, त्याला साफ करण्याचे काम एसटीच्या मार्फेत केले जाणार आहे. महानगरपालीकेच्या नाल्यांमध्ये डेपो आगारातील पाणी सोडण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी काम केले जात असल्याचे बांधकाम विभागाच्या उपमहाव्यवस्थापक विद्या भिलारकर यांनी सांगितले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com