Monorail Halts Between Bhakti Park and Mysore Colony : मुंबई, ता.१९ : चेंबूर (पूर्व) येथील माहुल परिसरात भक्ति पार्क व म्हैसूर कॉलनी या स्थानकांच्या दरम्यान धावणारी मोनोरेलमध्ये बिघाड होऊन अचानक थांबल्याने प्रवाशांची मोठी अडचण झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोनोरेलमधील प्रवासी अडकून पडले होते.