
मुंबई : चेंबूर वाशीनाका (Chembur) येथील दरडीचा धोका (Land Collapse) असलेल्या रहिवाशांचे तात्पुरते स्थालांतर महानगर पालिकेने (BMC) सुरु केले आहे. या मृत्यूच्या दाढेतून कायमस्वरुपी स्थालांतरीत (People Shifting) होताना या रहिवाशांपुढे पोटाचा प्रश्न आहे. या वसाहती मध्ये राहाणाऱ्यांची रोजीरोटी मुलांच्या शाळा (School) याच परीसरात आहे. त्यामुळे या मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडू पण पोट कसं भरु असा पेच या रहीवाशांपुढे आहे. ( Mumbai Chembur Monson tragedy shifted people face earning Problem and school issues-nss91)
दरड कोसळेल्या परीसरातून आता पर्यंत 38 कुटूंबाना चेंबूर येथील पर्यायी जागेत स्थालांतरीत करण्यात आले आहे.हे स्थालांतर तात्पुरत्या स्वरुपात असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.मात्र,यातही काही जणांनी पालिकेच्या पर्यायी जागेत जाण्या ,,वजी नजीकच्या नातेवाईकांना राहाण्याचा पर्याय स्विकारला आहे.धोकादायक स्थीतीत असलेल्या नागरीकांचे युध्दपातळीवर तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी व्यवस्था केली जात आहे असे स्थानिक नगरसेविका निधी शिंदे यांनी सांगितले. ज्या जागेत लहानाचे मोठोे झालो त्या घरांची अशी अवस्था आता पाहावत नाही.पण,पर्यायी जागेत महानगर पालिकेने स्थालांतर केले तर तेथे गेल्यावर मुलांच्या शाळा,पोटापाण्याचे काय होणार असा प्रश्न येथील रहिवाशी विचारतात.वस्त्यांमधील लोकांचे रोजगार आजूबाजुलाचा आहे.त्यामुळे फार लांब स्थालांतर झाल्यास रोजगाराचा प्रश्न आहे.अशी व्यथाही या रहिवाशी व्यक्त करतात.
भिमराव सारखे हेही याच वसाहतीचे रहिवाशी दरडीच्या दुर्घटनेत त्यांनी त्यांचे पाच कुटूंबिय गमावले.पण,हा भाग कायमस्वरुप सोडण्याचा प्रश्न पुढे आल्यावर ते कचरतात.अनेकांचे रोजगार याच भागातील आहे.त्यांना येथून हलविल्यास पोट कसे भरु असा त्यांचा प्रश्न.सध्या पालिका तात्पुरत्या स्वरुपात स्थालांतर करत आहे.असेही ते नमुद करतात. हातावर पोट घेऊन मिळेल ते काम करुन जगणारी ही वस्ती,पण कोणा समोर हात पसरवत नव्हते.या दुर्घटनेत अनेकांचे संसारच चिखलाखाली गाडले गेले आहे.अंगावरच्या कपड्यांवर हि कुटूंब पर्यायी जागेत आले आहेत.या रहिवाशांना पालिका काही कंपन्या तसेच सामाजिक संस्थां मार्फत जेवण पुरविण्यात आले आहे.
कायमस्वरुपी तोडगा निघणार ?
या परीसरात धोकादायक स्थीतीत राहाणाऱ्या नागरीकांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याचा विचार महानगर पालिका करत आहे.त्यासाठी महानगर पालिका सर्व पर्यायांचा विचार करत आहे.असे सांगण्यात आले.
‘ कायमस्वरुपी पर्यायी जागा कोठे असेल हा प्रश्न आहे.पर्यायी जागा या ठिकाणापासून लांब असेल तर आमच्या रोजगाराचा मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे.त्यामुळे ही टेकडी सुरक्षीत करण्याचा विचार यंत्रणांनी करायला हवा- भिमराव साखरे,स्थानिक नागरीक
वि्क्रोळी सुर्यानगर येथील दुर्घटनेच्या ठिकाणच्या 30 नागरीकांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले आहे.या नागरीकांची तात्पुरते सोय नजीकच्या महापालिका शाळेत करण्यात अाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.