Mumbai Ganeshotsav:लालबागच्या गर्दीवर रेल्वे पोलिसांचा वॉच: चिंचपोकळी, करी रोडवर २१९ आरपीएफ जवानांसह ५५ तिकीट तपासनीस

Ganeshotsav Security At Chinchpokli And Currey Road : लालबागचा राजा, चिंचपोकळी चिंतामणी दर्शनासाठी वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिंचपोकळी व करी रोड स्थानकांवर २१९ आरपीएफ जवान आणि ५५ तिकीट तपासक तैनात; विनातिकीट प्रवासी व सुरक्षेवर कडक नजर
Railway police security arrangements at Chinchpokli and Currey Road stations during Ganeshotsav.

Railway police security arrangements at Chinchpokli and Currey Road stations during Ganeshotsav.

sakal

Updated on

मुंबई, : लालबागचा राजा आणि चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी चिंचपोकळी आणि करी रोड स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. या दोन्ही स्थानकांवर २१९ आरपीएफ जवान आणि ५५ तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दी नियंत्रणासह विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com