
मुंबई: मुंबईचे नवे पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे पदभार स्वीकारल्यापासून महत्वाचे निर्णय घेत आहेत. २९ फेब्रुवारीला परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांच्याकडून पोलिस आयुक्त पदाचे सूत्रं हाती घेतले होते. यानंतर आता लगेचच ऍक्शनमध्ये येत परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांनी घेतलेले २ निर्णय तत्काळ मागे घेतले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या आधी काही निर्णय घेतले होते. मात्र अवघ्या ४ दिवसात परमबीर सिंह यांनी त्यांचे निर्णय मागे घेतले आहेत.
कोणते आहेत हे निर्णय:
संजय बर्वे यांनी १२ अधिकाऱ्यांची पगारवाढ एक वर्षासाठी थांबवली होती. हा निर्णय परमबीर सिंह यांनी मागे घेतला आहे. खरं म्हणजे १२ अधिकाऱ्यांनी डिजीपी सुबोध जयस्वाल यांच्याकडे एटीसमध्ये सामील करून घेण्यासाठी निवेदन दिलं होतं. डिजीपी यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं होतं. मात्र या १२ अधिकाऱ्यांनी आधी संजय बर्वे यांच्याकडे न जाता थेट डिजीपी यांच्याशी संपर्क साधला त्यामुळे संजय बर्वे नाराज होते. म्हणूनच या अधिकाऱ्यांची पगारवाढ संजय बर्वे यांनी रोखली होती अशी माहिती समोर येतेय.
मात्र हे सर्व प्रकरण समजल्यानंतर नवे आयुक्त परमबीर सिंह यांनी संजय बर्वे यांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. या १२ अधिकाऱ्यांनी आधी एटीस प्रमुख देवेन भारती यांच्यासोबत ही काम केलं आहे. यात सीनियर इन्स्पेक्टर नितीन अलकनूरे, दिनेश कदम, इन्स्पेक्टर नंदकूमार गोपाळे,सुधीर दळवी,संतोष भालेकर,लक्ष्मीकांत साळुंखे, दीप बने,विशाल गायकवाड आणि दीपाली कुलकर्णी असे काही नावं आहेत.
तसंच संजय बर्वे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या अवघ्या २ दिवसांआधी २५ अधिकाऱ्यांची बदल्या केल्या होत्या. मात्र परमबीर सिंह यांनी पदभार स्वीकारताच संजय बर्वे यांचा हा निर्णय मागे घेतला आहे.
आता येणाऱ्या काळात परमबीर सिंह हे संजय बर्वे यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांना तपासून बघणार आहेत. दरम्यान माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांनी घेतलेले अजूनही काही निर्णय मागे घेतले जाण्याची शक्यता आता वर्तवली जातेय.
mumbai commissioner parambir singh took back decisions taken by former commissioner sanjay barve
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.