आधी सुटकेसमध्ये मानवी अवयव आता डोकं आणि पाय नसलेला मृतदेह

आधी सुटकेसमध्ये मानवी अवयव आता डोकं आणि पाय नसलेला मृतदेह
Updated on

मुंबई : माहीम येथे सुटकेसमध्ये मानवी अवयव सापडलेल्या प्रकरणांचा गुंता गुन्हे शाखेने सोडवला असतानाच, घाटकोपर येथे शीर आणि दोन्ही पाय नसलेला बेडशीटमध्ये गुंडाळलेला महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

घाटकोपर पोलिसांनी शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह राजावाडी रुग्णालयात पाठवला असून, मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, घाटकोपर परिसरात महिला हत्येचा हा तीसरा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घाटकोपर परिसरातील नवलगेट जवळ एस. टी. वर्कशॉपच्या रस्त्याच्या वळणावर सोमवारी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान रक्ताने माखलेल्या गाऊन आणि बेडशीटमध्ये गुंडाळलेला महिलेचा मृतदेह सापडला. शीर आणि गुडघ्यापासून खाली दोन्ही पायाचे भाग बेपत्ता असलेल्या मृतदेहाची माहिती मिळताच घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. 

मृतदेहाचे शीरच गायब असल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांपुढे आव्हान असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकारे माहिम येथील समुद्रात मृतदेहाचे अवयव असलेली बॅग सापडली होती. तपासात दत्तक घेतलेल्या अल्पवयीन मुलीने प्रियकरच्या मदतीने पित्याची हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते तीन बॅगांमध्ये भरून मिठी नदीत फेकल्याचे उघड झाले होते. यामुळे महिलेच्या मृतदेहाचा तपासही पोलिस त्याच दिशेने करत असल्याचे सांगण्यात आले.  

WebTitle : mumbai cops found a body without head and legs investigation is on

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com