esakal | मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बालकांना फटका; संसर्गाचे प्रमाण वाढले
sakal

बोलून बातमी शोधा

children

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बालकांना फटका; संसर्गाचे प्रमाण वाढले

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईतील (mumbai) लहान मुलांमधील (children) कोविड केसेसमध्ये (corona cases) वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. जेव्हा तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेचा (corona third wave) आणि त्याचा मुलांवर परिणाम (ipmact on children) होण्याचा इशारा दिला आहे. तेव्हा ही संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान, पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोविड संसर्गाचे प्रमाण वाढलेले दिसते. पालिकेच्या (BMC) आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या लाटेत 0 ते 18 वर्षांपर्यंतच्या 7 टक्के बालकांना कोविडची बाधा झाली आहे.

हेही वाचा: गौतम नवलखा यांच्या याचिकेवर एनआयए आणि राज्य सरकारने खुलासा करावा- हायकोर्ट

कोविडची पहिली लाट मुंबईत मार्च महिन्यापासून सुरु झाली. त्यावेळेस 0 ते 18 वर्षापर्यंतच्या जवळपास 5 टक्के लहान मुलांना कोविडचा संसर्ग झाला होता. एकूण लोकसंख्येपैकी 14 हजार 442 एवढी लहान मुले पहिल्या लाटेत बाधित झाले होते. त्यानंतर 2021 च्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचे प्रमाण 2 टक्क्यांनी वाढले असून एकूण 28 हजार 058 0 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना कोविडची लागण झाली आहे.

 दरम्यान, काही दिवसांपूर्वी भायखळा येथील अनाथ आश्रमातील 15 आणि मानखुर्द येथील बालगृहातील 18 मुले कोविड पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, 18 वर्षांखालील लहान मुलांसाठी अजूनही कोविड संसर्गावरील लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे, संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांनाच सर्वाधिक धोका असू शकतो असे वैद्यकीय तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

“ जूनमध्ये झालेल्या तिसऱ्या सेरो-सर्वेमध्ये असे दिसून आले की 51 टक्के मुलांमध्ये कोविड अँटीबॉडीज आहेत. ज्यातून असे समोर येते की दुसर्‍या लाटेदरम्यान लक्षणीय मुले विषाणूच्या संपर्कात होते. दुसरे कारण म्हणजे निर्बंध शिथील झाल्यानंतर मुले बाहेर पडू लागली आहेत. तसेच, कोविडचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या पालकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे दीर्घकाळ मदत करेल."

-सुरेश काकाणी, अतिरिक्त आयुक्त, पालिका

हेही वाचा: राममंदिर बांधकामात आमदार गोरे यांनी कारसेवेने प्रायश्चित्त घ्यावे- मनीषा कायंदे

0-18 वर्षे               रुग्ण           टक्के

पहिली लाट         14,442             5%

दुसरी लाट        28,058                7%

दरम्यान, राज्यातही लहान मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण वाढत असून आतापर्यंत 0 ते 10 वर्षांपर्यंतच्या 2 लाख 6 हजार 70 लहान मुलांना कोविड संसर्ग झाला आहे. त्यामुळे, पालकांनी आता आणखी सजगपणे वागण्याची गरज असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञ मांडतात. 

दुसऱ्या लाटेत एप्रिल, मे आणि जून दरम्यान लहान मुलांमध्ये एमआयएससी आजाराचे आणि कोरोनाचे प्रमाण वाढले ज्यात पीआयसीयू ची गरज मोठ्या प्रमाणात होती. अजूनही हे रुग्ण आहेत पण पहिल्या पेक्षा प्रमाण कमी आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. तिसऱ्या लाटेसंदर्भातील पालिकेची लहान मुलांसाठी तयारी सुरू आहे. मध्यंतरी झालेल्या सिरो सर्वनुसार बऱ्यापैकी मुलांमध्ये 50 ते 60 टक्के अँटीबॉडीज तयार झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्यात आता संसर्ग वाढत आहे. 

-डॉ. राधा घिलडियाल,  प्राध्यापक आणि विभाग प्रमुख, बालरोग चिकित्सा शास्त्र विभाग, सायन रुग्णालय 

लहान मुलांना कोविड होण्याची प्रमुख कारणे - 

लहान मुलांचे लसीकरण अद्याप झालेले नाही.

कोविड साठी लागणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व लहान मुलांना कळत नाही. 

मुलांमध्ये कोविडचे निदान करणे कठीण असते.

लक्षण नसलेल्या व सौम्य लक्षणे असलेल्या मुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे (90 ते 95 टक्के) 

लहान मुलांमधील अनेक आजारांची लक्षणे कोविड सारखीच असतात. 

पालिकेच्या सायन रुग्णालयाने संपूर्ण महाराष्ट्रभर लहान मुलांमधील कोविड संसर्गाच्या मार्गदर्शनासाठी जूनपासून आतापर्यंत 4 वेबिनार आयोजित केले आहेत. ज्यात हेल्थ केअर वर्कर्स, जनरल प्रॅक्टिशनर, हेल्थ वर्कस, डॉक्टर्स , पालिकेचे अधिकारी, एचआयव्ही सेंटर यांचा समावेश होता असेही डॉ. घिलडियाल यांनी सांगितले.

loading image
go to top