esakal | कोविड चाचणीच्या गोंधळात महिला प्रवाशावर कारवाईचा बडगा | Corona Test
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Test

कोविड चाचणीच्या गोंधळात महिला प्रवाशावर कारवाईचा बडगा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोविड चाचणीच्या (corona test) पॉझिटिव्ह निगेटिव्ह वादात परदेशवारी चुकलेल्या महिलेला (Women) आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या महिलेविरोधात साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय महापालिकेने (BMC action) घेतला आहे. दरम्यान, या प्रकरणी विमानतळ प्रशासनाशी वाद घातल्याबद्दल कॉंग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू (Sufiyan vanu) यांना मंगळवारी अटक केली होती. १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन (bail granted) मंजूर झाला.

हेही वाचा: मुंबईतील क्षयरोग हद्दपार करण्यासाठी महानगरपालिकेचा करार

वडाळा येथील एक ३५ वर्षीय महिला ८ मे रोजी आपल्या मुलासह बहरीनला जाणार होती. तत्पूर्वी दोघांनीही वडाळा येथील खासगी प्रयोगशाळेत आरटी-पीसीआर चाचणी करून घेतली. तो अहवाल निगेटिव्ह होता; मात्र विमानतळावर पोहचल्यावर त्यांच्या चाचणीची मुदत काही मिनिटांपूर्वी संपली असल्याने त्यांना पालिकेने ठरवलेल्या प्रयोगशाळेत पुन्हा चाचणी करावी लागली; मात्र ही चाचणी पॉझिटिव्ह आल्याने पालिकेच्या पथकाने त्यांना विलगीकरण केंद्रात पाठवण्याचा निर्णय घेतला.

परंतु महिलेने विलगीकरण केंद्रात जाण्यास विरोध केला. हा प्रकार महिलेने वडाळा येथील कॉंग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांना सांगितला. त्यानंतर वणू हे विमानतळावर पोहोचले आणि त्यांनी पालिकेच्या पथकाशी वाद घालण्यास सुरुवात केली. वणू यांनी सदर महिलेची वडाळा येथील खासगी प्रयोगशाळेत पुन्हा चाचणी केली असता तो अहवाल निगेटिव्ह आला.

हेही वाचा: कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई ; NCB चे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

म्हणून कारवाई

या प्रकरणाची पालिकेचे उपायुक्त पराग मसुरकर यांच्यामार्फत चौकशी करण्यात आली. या चौकशीत विमानतळावरील अहवाल पॉझिटिव्ह आला असतानाही महिला विलगीकरणात न गेल्याने सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणले, असा ठपका ठेवला. त्यानुसार त्या महिलेसह वणू यांच्यावर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आता महिलेवर कारवाई होणार आहे.

वणू यांना अटक सुटका

या प्रकरणात वणू यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे.

loading image
go to top