Mumbai Corona Update : मुंबईत 213 नवीन रुग्ण 3 रुग्ण दगावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Mumbai Corona Update : मुंबईत 213 नवीन रुग्ण 3 रुग्ण दगावले

मुंबई : नवीन रुग्ण वाढले असून आज 213 नविन रुग्ण आढळले.कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,61,146 वर पोहोचली आहे. आज 281 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,39,707 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

मुंबईतील नवीन रुग्णांसह सक्रिय रुग्णांची संख्या आणखी कमी झाली असून 2577 पर्यंत खाली आली आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी वाढून 2403 दिवस झाला आहे.मुंबईतील रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याने पॉझिटिव्हिटी दर देखील 0.03 पर्यंत खाली आला आहे.

मुंबईत मृत्यूंची संख्या नियंत्रणात असून आज 3 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,306 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.03 टक्के झाला आहे.

हेही वाचा: मुंबईतील सुरक्षारक्षक आहेत की गुंड ?; पाहा व्हिडीओ

मुंबईत कोविड चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत. आज दिवसभरात 31,801 कोविड चाचण्या केल्या गेल्या असून आतापर्यंत 1,21,40,647 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.

loading image
go to top