Genome Sequencing : आफ्रिकेहून आलेल्या प्रवाशांसह 350 नमुन्यांची चाचणी

Corona test
Corona testsakal media

मुंबई : आफ्रिकन कोरोना म्युटंट ओमिक्रॉन (Omicron variant) सोबत लढण्यासाठी मुंबई महापालिका (BMC) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यानुसार, पालिका आज (30 नोव्हेंबर) एकूण 350 नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग (Genome sequencing) करणार आहे. गेल्या पंधरा दिवसात ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित देशातून आलेल्या परदेशी प्रवाशांची (travelers from abroad) महानगरपालिकेने कोरोना चाचणी (corona test) केली. त्यापैकी एक ही प्रवासी कोरोना बाधित आढळला नाही.

Corona test
मुंबई : प्राईम मॉलला अग्निशमन दलाची नोटीस; दुरुस्ती न केल्यास कारवाई

गेल्या 15 दिवसात मुंबईत ओमिक्रोन व्हेटीएन्टचा प्रभाव असणाऱ्या देशातून 466 प्रवासी मुंबईत उतरले. त्यापैकी 100 प्रवासी मुंबईतील आहेत आणि 366 प्रवासी हे इतर जिल्हे तसेच राज्यातील आहेत. त्यानुसार, या प्रवाश्यांचे 100 आणि इतर श्रेणीतील 100 आणि आजच्या दिवसात आणखी 150 नमुने जिनोम सिक्वेसिंग साठी गोळा करुन आजच हे नमुने लोड केले जातील असे पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

काकाणी म्हणाले की, जीनोम सिक्वेन्सिंगसाठी आतापर्यंत 200 नमुने गोळा करण्यात आले आहेत. अशा प्रकारे, 350 नमुन्यांवर जीनोम सिक्वेन्सिंग केले जाईल. यावेळी मुंबईलगतच्या सर्व पालिकांकडून जीनोम सिक्वेन्सिंगसाठी नमुनेही मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विमानतळ प्रशासनाकडून या सर्व प्रवाश्यांची माहिती महानगरपालिकेने मिळवली असून सर्व प्रवाश्यांची संपर्क केला. सोमवारी या सर्व प्रवाश्यांची कोरोना आरटी-पीसीआर चाचणी देखील केली. याचा अहवाल दोन दिवसात येईल. यासह पालिका जिनोम सिक्वेसिंगचा पाचवा लाॅट लोड करणार आहे.

या जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालात एखादी व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळली तर त्यांच्यावर उपचार करण्याची सोय केलेली आहे. त्यांना दाखल करण्याची, उपचारांची आणि औषधांची व्यवस्था केलेली आहे. डोंबिवलीतील पाॅझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग याचवेळेस केले जाईल. त्याआधी आरटी-पीसीआरचा अहवाल पालिकेला प्राप्त होईल. आणि किमान चार ते पाच दिवसांत जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालातून मुंबईतील किती नमुने ओमिक्रोनसाठी पाॅझिटिव्ह आले आहेत हे समजेल असेही काकाणी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com