मुंबईत कोरोनाचा विळखा सैल; 94 टक्के खाटा रिकाम्या | Mumbai Corona update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Bed

मुंबईत कोरोनाचा विळखा सैल; 94 टक्के खाटा रिकाम्या

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत कोरोना (corona) कमकुवत होत चालला आहे. संपूर्ण शहरात कोविडसाठी राखीव असलेल्या एकूण खाटांपैकी 94 टक्के खाटा रिकाम्या (vacant beds) आहेत. मुंबईत 2 हजार 823 सक्रिय कोविड रुग्ण (Active corona patient) असले तरी त्यापैकी 1 हजार 524 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे (symptoms) किंवा आरोग्य समस्या नाहीत.

हेही वाचा: मुंबई काँग्रेसमधली भांडण, भाई जगतापांची थेट सोनिया गांधींकडे तक्रार

मुंबईतील कोविड रूग्णांसाठी, शहरातील 23000 कोविड खाटांपैकी केवळ 1500 खाटांवर उपचार सुरू आहेत. कमी रुग्णांमुळे 11 जंबो सेंटर्सपैकी काही सुरू आहेत, बाकीचे स्टँडबाय ठेवण्यात आले आहेत. जंबो सेंटरमध्ये 6,000 बेडवर केवळ 300 रुग्णांवर उपचार केले जात आहेत. कोविड रुग्णांची घटती संख्या, त्यातही रुग्णालयात दाखल होण्याची गरज कमी आहे, ही दिलासादायक बाब आहे.

अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, कोविडचे रुग्ण लक्षणीयरित्या कमी झाले आहेत. लसीकरणामुळे लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली आहे. आमच्या सक्रिय रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे.

रिकव्हरी दर 97%

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला तेव्हा 15 नोव्हेंबरपर्यंत मुंबईत कोरोनाच्या दोन लाटांमध्ये एकूण 7 लाख 59 हजार 593 बाधित रुग्ण आढळून आले, त्यात 7 लाख 37 हजार 930 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.

हेही वाचा: खारघर मध्ये ११ वर्षीय मुलीवर चुलत्या कडून लैंगिक अत्याचार

कोविडने 16,292 घेतले प्राण-

मुंबईत कोविडमुळे आतापर्यंत 16 हजार 292 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, आता मुंबईतील मृतांचा आकडाही एक अंकावर पोहोचला आहे.

इमारतीही कोरोना मुक्तीच्या दिशेने

एकेकाळी मुंबईत कोविडमुळे सुमारे एक हजार इमारती सील करण्यात आल्या होत्या, मात्र आता त्यांची संख्या 15 झाली आहे. झोपडपट्ट्यांप्रमाणेच इमारतीही कोरोनामुक्त होत आहेत, तरीही हजारो मजले सीलबंद आहेत.

जंबो कोविड सेंटरमध्ये रुग्ण

एनएससीआय, वरळी - 15

नेस्को गोरेगाव - 13

मुलुंड जंबो सेंटर - 90

बीकेसी जंबो सेंटर - 6

भायखळा आरएसी - 20

सेव्हन हिल्स अंधेरी - 100

मुंबईची सद्यस्थिती

एकूण सक्रिय रुग्ण - 2823

लक्षणे असलेले रुग्ण - 1041

लक्षणे नसलेला - 1524

गंभीर रुग्ण - 258

कोविड दुप्पट दर - 2010 दिवस

एकूण 2,166 आयसीयू बेडपैकी 1,808 आणि 7, 464 ऑक्सिजन बेड्स आहेत. डॉक्टरांना विश्वास आहे की पुढील आठवड्यापासून ही टक्केवारी आणखी कमी होईल. एप्रिल महिन्यापासून बेड वाटपाची प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात आली होती. प्रणाली विकेंद्रीकरण केले आणि वॉर्ड वॉर रूम्स स्थापन केल्या आहेत जेणेकरून तातडीची गरज असलेल्या रुग्णांना बेड मिळतील,असेही काकाणी यांनी स्पष्ट केले. पालिकेकडे पाइपलाइनमध्ये दोन ते तीन नवीन रुग्णालये आहेत ज्यांचे उद्घाटन या महिन्यात होणार आहे. नवीन रुग्णालये आणि इतर वैद्यकीय महाविद्यालयांच्या युनिट्समध्ये जंबो सेंटरमध्ये न वापरलेली अतिरिक्त उपकरणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे.

loading image
go to top