Mumbai Corona Updates: मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात, प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ

मिलिंद तांबे
Tuesday, 2 February 2021

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असली तरी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे.

मुंबई: मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात आली असली तरी मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे.

मुंबईतील कोरोना स्थिती नियंत्रणात येत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या ही झपाट्याने खाली आली. मात्र मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे. 12 जानेवारीला 151 प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या होती. आता त्यात वाढ झाली होऊन 27 जानेवारीला 203 झाली. तर 1 फेब्रुवारीला 192 प्रतिबंधित क्षेत्र असून सीलबंद इमारतींची संख्या 2022 इतकी आहे. 

मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी 564 दिवसांपलीकडे गेला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर 0.12 टक्यांपर्यंत खाली आला आहे. दरदिवशी केवळ 400 ते 500 रुग्ण आढळत असून त्यापैकी बहुतांशी रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. गंभीर रुग्णांचे प्रमाणही कमी झाले असून, मृत्यूदरही 4 टक्क्यांवर आला आहे. 

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्रात वाढ होत असून 12 जानेवारीपर्यंत मुंबईतील 6 विभागांत
एकही प्रतिबंधित क्षेत्र नव्हतं. महापालिकेच्या नियंत्रण कक्षाद्वारे संगणकीय पद्धतीनं प्रतिबंधित क्षेत्रे अद्ययावत केली जात आहेत. यामुळे एखाद्या रुग्णाचं नाव आणि पत्ता यात समाविष्ट केल्यानंतर संगणकीय पद्धतीनं तो विभाग प्रतिबंधित दाखवण्यात येतो. मात्र, प्रत्यक्षात एकापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत असतील तर क्षेत्र प्रतिबंधित केल्याची कारवाई केली जात असल्याचं सांगण्यात आले.

हेही वाचा- बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी NCBची मोठी कारवाई, कनेक्शन आहे थेट सुशांत सिंह राजपूतशी

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Corona Updates status Mumbai under control increase restricted areas


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Corona Updates status Mumbai under control increase restricted areas