esakal | मुंबईत पहिल्या डोसचे लक्ष्य लवकरच होणार पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

मुंबईत पहिल्या डोसचे लक्ष्य लवकरच होणार पूर्ण

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : मुंबईत (Mumbai) 18 वर्षांवरील 90 लाख लोकांना लसीकरण (corona vaccination) करण्याचे लक्ष्य महानगरपालिकेने (bmc) ठेवले आहे. यातही दिलासादायक बाब अशी आहे की, मुंबईतील 92 टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस (first dose) घेतला आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, फेब्रुवारी ते मार्च 2022 दरम्यान, सर्व मुंबईकरांना दुसरा डोस दिला जाईल.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

मुंबईत लसीकरणाचा वेग भलेही कमी राहिला असला तरी गेल्या काही महिन्यांत लोकांकडून इतका चांगला प्रतिसाद मिळत आहे की अनेक वेळा केंद्रांवर लसीचा तुटवडा भासतो. बुधवारी शहरात 1,45,873 लोकांना लसीकरण करण्यात आले, यासह, मुंबईत आतापर्यंत 83 लाख 49 हजार 458 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे आणि विशेष बाब म्हणजे 43 लाख 6 हजार 645 लोकांना लसीचा दुसरा डोस देखील मिळाला आहे. म्हणजेच, ज्यांनी आतापर्यंत लस घेतली आहे त्यांच्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत लसीकरण मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हे असेच चालू राहिल्यास, आम्ही येत्या वर्षात फेब्रुवारी ते मार्च दरम्यान लसीकरणाचे काम पूर्ण करू.

महिलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद

पालिकेने महिलांसाठी 3 वेळा विशेष लसीकरण मोहीम राबवली आहे. प्रत्येक वेळी 1.2 लाखांहून अधिक महिलांना विशेष मोहिमेअंतर्गत लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाच्या मोहिमेला अधिक गती मिळावी म्हणून महापालिका आठवड्यातून एकदा तरी महिलांसाठी विशेष मोहीम भरवणार आहे.

पुरुष अजूनही आघाडीवर

मुंबईत लिंगनिहाय लसीकरणाची आकडेवारी पाहिल्यास तर, पुरुष अजूनही आघाडीवर आहेत.  आतापर्यंत झालेल्या एकूण लसीकरणांपैकी 72 लाख 25 हजार 429 पुरुष आणि 54 लाख 27 हजार 671 महिलांनी लसीचा पहिला किंवा दोन्ही डोस घेतले आहेत. तर, बाकी इतर कॅटेगरीतील लोकांचा समावेश आहे.

हेही वाचा: BMC: भेंडी बाजाराच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी २४ भुखंडाचे हस्तांतर

राज्यात 8.09 कोटी नागरिकांचे लसीकरण

बुधवारपर्यंत राज्यात 8 कोटी 9 लाख 88 हजार 347 लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. यापैकी 5 कोटी 70 लाख 78 हजार 517 लोकांनी पहिला डोस घेतला आणि 2 कोटी 39 लाख 9 हजार 830 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

लसीकरणातील पहिले 5 जिल्हे

मुंबई- 1,26,56,103

पुणे- 1,04,78,166

ठाणे- 66,48,710

नागपूर- 36,84,332

नाशिक- 36,83,993

लसीकरणाचे प्रमाण कमी असलेले जिल्हे

हिंगोली - 5,63,527

गडचिरोली- 570782

सिंधुदुर्ग- 700530

वाशिम- 729848

नंदुरबार - 869113

loading image
go to top