esakal | खास बातमी, कोरोना संदर्भात मुंबईकरांसाठी 'ही' दिलासादायक माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

खास बातमी, कोरोना संदर्भात मुंबईकरांसाठी 'ही' दिलासादायक माहिती

मुंबईत गुरूवारी दिवसभरात ९१० नवीन रुग्ण आढळून आले. तर गुरूवारी दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

खास बातमी, कोरोना संदर्भात मुंबईकरांसाठी 'ही' दिलासादायक माहिती

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. मुंबईतही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईत प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जाताहेत. त्यातच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ती म्हणजे, मुंबईत काही प्रमाणात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश आल्याचं चित्र पाहायला मिळतंय.  मुंबईत गुरूवारी दिवसभरात ९१० नवीन रुग्ण आढळून आले. तर गुरूवारी दिवसभरात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

हा आलेख आणखी सुधारावा आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून नवीन रुग्णसंख्या कमी करण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

अधिक वाचाः  मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट, अटक केलेल्या महिलेचं भाजप कनेक्शन

गुरुवारी मुंबईत ९८८ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने कोरोनावर मात करणाऱ्या एकूण कोरोनामुक्तांची संख्या ९२ हजार ६६१ इतकी झाली आहे. त्याचवेळी गेल्या २४ तासांत ९१० नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण रुग्णसंख्या १ लाख २० हजार १६५ इतकी झाली आहे. त्यापैकी २० हजार ५६२ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत. त्यामुळं मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

हेही वाचाः  Unlock 3.0: नवी मुंबईपालिकेचा यू-टर्न, घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबईत गेल्या २४ तासात कोरोनाचे ५७ रुग्ण दगावले आहेत. तर ४ ऑगस्टला ५६ मृत व्यक्तींची नोंद झाली आहे. त्यापूर्वी ५ ऑगस्टला एकूण ४२ जण या आजाराला बळी पडल्याचे पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७७ टक्के इतके असून ३० जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीतील रुग्णवाढीचा वेग ०.८७ टक्के इतका आहे. मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी आता ८० दिवसांवर पोहोचला आहे.

अधिक वाचाः  मुंबईकरांना प्रत्येकी १० हजार रुपये द्या, वाचा कोणी केली 'ही' मागणी

आतापर्यंत मुंबईत ५ लाख ७४ हजार ९१९ इतक्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्यात. सध्या शहर आणि उपनगरातील चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये ६२१ कंटेन्मेंट झोन असून ५ हजार ६०९ इमरती सील करण्यात आल्यात. 

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण अजूनही जास्त आहे. गेल्या २४ तासात मुंबईत कोरोनामुळे ५७ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण मृतांची संख्या ६६४५ इतकी झाली. ५७ मृत रुग्णांपैकी ४१ रुग्ण अन्य व्याधींनी ग्रस्त होते. त्यात ३५ पुरुष आणि २० महिला रुग्णांचा मृत्यू झाला. २ मृत रुग्ण ४० वर्षांखालील, ३० जण ६० वर्षांखालील तर २५ रुग्ण ४० ते ६० वर्षे वयोगटातील होते, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे.

Mumbai Corona virus Updates Recovery Rate Increases 77 Per Cent