esakal | आनंदाची बातमी! मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

आनंदाची बातमी! मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात

sakal_logo
By
मिलींद तांबे

मुंबई : कोरोना काळात (coronavirus) आतापर्यंत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, गेल्या महिन्याभरापासून हा मृत्यूदर कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या महिन्यात ३२ हजार ५५२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तर मृत्यूदर ही 1.88 % वर पोहोचला असून मृत्युदरात 0.38 % ने वाढला आहे. विशेष म्हणजे मुंबईत कोविडग्रस्त रुग्णसंख्या आटोक्यात येत असून मृत्युदर ही नियंत्रणात येत आहे. मुंबईत सरासरी 22 ते 25 मृत्यू होत असून मृत्युदर ही 1.27 टक्क्यांवर आला आहे. (coronavirus-mumbai-covid-death-rate-rises)

गेल्या महिन्यात राज्यातील एकूण मृत्यूचा आकडा 79 हजार 552 वर पोहोचला होता. तर, मृत्युदर 1.5 % इतका होता. गेल्या महिन्याभरात 31 हजार 552 मृत्यूची भर पडली असून मृत्युदर 1.88 % वर पोहोचला आहे. यामध्येच केवळ आठवड्याभरात 10 हजार 634 मृत्यूंची भर पडली आहे.

हेही वाचा: मुलांची घ्या काळजी; आयुष मंत्रालयाची नवीन गाईडलाईन

राज्यात एकूण सक्रीय रुग्ण 1 लाख 67 हजार927 आहेत, तर रुग्णालयात भरती असलेले रुग्ण 66 हजार 688 (39.7%) आहेत. लक्षणविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण 1,01,239 (60.3%) तर गंभीर रुग्ण 2 हजार,401 (17.51%) इतके आहेत.

राज्यातील परिस्थिती-

• आयसीयू मधील रुग्ण: 10 हजार 848 (सक्रीय रुग्णांच्या 6.46%),

• व्हेंटीलेटरवरील रुग्ण: 4 हजार 469 (सक्रीय रुग्णांच्या 2.66%)

•ऑक्सिजनवरील रुग्ण: 6,369 (सक्रीय रुग्णांच्या 3.80%)

•आयसीयू बाहेरील ऑक्सिजनवरील रुग्ण: 18,553 (सक्रीय रुग्णांच्या 11.05%)

हेही वाचा: वयात येणाऱ्या मुलींना 'या' गोष्टी चुकूनही सांगू नका!

"पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील रुग्ण दुपटीपेक्षा अधिक वाढले. त्यात सक्रिय तसेच गंभीर रुग्णांची संख्या अधिक होती. राज्यतील नऊ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर मोठा आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याशिवाय मृत्यूदर कमी होणार नाही. पुढील महिनाभर मृत्यूदर वाढण्याची शक्यता आहे," असं राज्य मृत्यू परीक्षण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणाले.

संपादन : शर्वरी जोशी

loading image