
नवी मुंबईतील जुईनगर इथं एका ५५ वर्षीय कम्प्युटर प्रोग्रॅमरनं तब्बल ३ वर्षे घरात कोंडून घेतल्याचं समोर आलंय. एकटेपणा आणि नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तीचं नाव अनुप कुमार नायर असं आहे. आई-वडील आणि भावाच्या निधनामुळे नैराश्यात गेलेल्या अनुपमने घरातच कोंडून घेतलं होतं. ऑनलाइन फूड ऑर्डर केल्यानंतर ती द्यायला येणाऱ्या डिलिव्हरी बॉईजशीच त्याचा संपर्क असायचा. त्याव्यतिरिक्त कोणाशीच त्याचा संबंध येत नसे.