Mumbai: मोठा निकाल! गरोदरपणात सुनेला नोकरी सोडण्याचा सल्ला देणे ही क्रूरता नाही; मुंबई न्यायालयाचा निर्णय

Mumbai court ruling mother in law acquitted: गर्भावस्थेत नोकरी सोडण्याचा सल्ला ‘क्रूरता’ नाही, असा मुंबई कोर्टाने निर्णय दिला आहे. क्रूरता प्रकरणात पाच जणांना दिलासा देण्यात आला आहे.
Mumbai court ruling mother in law acquitted

Mumbai court ruling mother in law acquitted

ESakal

Updated on

मुंबईतील एका न्यायालयाने पती आणि सासूविरुद्धच्या क्रूरता आणि हुंडा प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सुनेने आरोप केला होता की, मुलीच्या जन्मापासून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि तिचा मानसिक छळ करण्यात आला. एका दंडाधिकारी न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, सुनेला गरोदरपणात नोकरी सोडण्याचा सासूने दिलेला सल्ला क्रूरता मानला जाऊ शकत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com