'मुंबईतील कोविड 19 च्या पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा खाली'

'मुंबईतील कोविड 19 च्या पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा खाली'

मुंबई: गेल्या 10 दिवसांत मुंबईतील कोविड 19 च्या रुग्णांचा पॉझिटिव्हीटीचा दर 5 टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. मात्र, जर नियमांचे पालन केले आणि लसीकरण मोहीम संपल्यानंतरही त्रिसुत्री पाळली तर दर आणखी कमी होईल असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 2020 या भारतातील सर्वात वाईट कोविड -19 हॉटस्पॉटपासून, मुंबईचा सकारात्मकतेचा दर आता गेल्या दहा दिवसांत 4.95 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार 11 जानेवारीपर्यंत शहरातील एकूण पॉझिटिव्हीचे प्रमाण 11.94 टक्के राहिले होते. जे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यांत 12.42 टक्के होते. पालिका अधिका-यांनी सांगितले की, मुंबईकरांनी कोविड 19 च्या नियमांचे पालन केले आणि लसीकरण मोहीम संपल्यानंतरही त्रिसुत्री पाळली तर पॉझिटिव्हीचा दर 10 टक्क्यांपेक्षा खाली जाईल.

महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, गेल्या 11 दिवसांत सुमारे 1.34 लाख चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यातील 6,658 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली. त्याचप्रमाणे 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जवळपास 1.53 लाख चाचण्या घेण्यात आल्या, त्यातील 6,586 लोक पॉझिटिव्ह आले.

दोन आठवड्यांसाठी 5% पॉझिटिव्हीटीचा अर्थ असा आहे की, आता अनेक सुविधा पुन्हा सुरू होऊ शकतात. पॉझिटिव्हिटी रेट म्हणजे चाचणी घेणार्‍यांच्या एकूण संख्येपैकी विषाणूचा संसर्ग होऊन पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची टक्केवारी.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, केसेस नियंत्रित करण्यासाठी घेतलेले सर्व प्रयत्नांना यश येत आहे. कारण, गेल्या दोन आठवड्यांतील पॉझिटिव्हीटीचा दर आता 5 टक्क्यांपेक्षा खाला आहे. त्यानंतर, एकूणच पॉझिटिव्ह दर आणखी खाली येण्याची आशा आहे. आम्ही व्हायरसला नियंत्रणात आणण्याच्या योग्य मार्गावर आहोत. दरम्यान, आम्ही आशा करतो की नागरिकांनी प्रोटोकॉल पाळले पाहिजे,  जेणेकरून एकूण पॉझिटिव्हीटीचा दर आणखी खाली येईल.

राज्य कोविड -19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, लोक सावधगिरी बाळगत असल्याने ही संख्या कमी झाली आहे. लोक मास्क वापरत आहेत, सामाजिक अंतर राखतात आणि नियमितपणे हात स्वच्छ करतात. ज्यामुळे संक्रमण थांबवण्यास मदत होते. तसेच, लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबद्दल घाबरत आहेत. त्यामुळे लोकांनी काळजी घेतली पाहिजे. 

-------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Mumbai Covid 19 positivity rate dropped below 5 percent last 10 days

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com