मुंबईत FDAची मोठी कारवाई, कोरोनावरच्या औषधांचा काळाबाजार उघड

मुंबईत FDAची मोठी कारवाई, कोरोनावरच्या औषधांचा काळाबाजार उघड

मुंबईः मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधांचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या औषधींचा आणि इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अशा काळाबाजार करणाऱ्या सेल्समनला अन्न व औषध पुरवठा विभागानं छापा टाकून अटक केली आहे. यात जणांच्या टोळीला अटक केल्याचं समोर आलं आहे. हे सेल्समन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतात. हे विक्रेते कोरोनावर असलेले उपचार करण्यासाठी रेमडेसीविर इंजेक्शन 30 ते 40 हजार रुपयात विकत होते.

कोरोना रुग्णांवर परिणामकारक असलेले रेमडेसीविर इंजेक्शन ज्याची किंमत 5 हजार रुपये आहे ते इंजेक्शन 30 ते चाळीस हजार रुपयांत विकत असल्याची माहिती अन्न व औषध पुरवठा विभागाला मिळाली. यावर या विभागाने मुलुंडमध्ये आपला खबरी पाठवून त्याची शहानिशा केली. खात्री झाली असता त्याला ताब्यात घेतले त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान दोन जणांची नाव समोर आली. त्यानंतर FDA नं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा 7 ला कळवून मदत घेतली.  यानंतर कारवाई केली असता एकूण 7 जणांना अटक करण्यात आली आहे. हे त्या औषध कंपनीतून ते परस्पर विकत असल्याची माहिती मिळाली असून यात अजून मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त सुनील भारद्वाज यांनी दिली. 

असा रचला सापळा

18 जुलै या दिवशी मुलुंड पश्चिम येथील बाल राजेश्वर मंदिर, एलबीएस रोड येथे बनावट ग्राहक पाठवून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी सापळा रचला. त्यावेळी विकास दुबे आणि राहुल गाडा हे एक रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन विक्री करण्यासाठी आले असता त्यांना या औषधाची विक्री करताना रंगेहाथ पकडले. 


पुढील तपासात कॉविफॉर (रेमडिसिविर इंजेक्शन) या औषधाच्या 06 व्हायलचा साठा राहुल गाडा यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आला. घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींच्या चौकशीत या औषधाच्या काळाबाजार करून विक्रीच्या साखळी मध्ये भावेश शहा, अशिष कनोजिया, रितेश ठोंबरे, गुरविंदर सिंग आणि सुधीर पुजारी (डेलफा फार्मासिटिकल, घाटकोपर, मुंबई) हे सामील असल्याचे आढळले. 

या सर्व व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर दोन ठिकाणाहून 12 आणि सापळ्या दरम्यान 1 अशा एकूण 13 रेमडिसिविर इंजेक्शनचा अवैधपणे बाळगलेला साठा जप्त करण्यात आला. या सर्व व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. ताब्यात घेण्यात आलेले सर्व व्यक्ती औषधे दुकानदाराकडे सेल्समन अथवा औषधी कंपनीचे विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत असल्याचे आढळून आले. हे औषध विक्रीकर्त्यांनी रुग्णांचा कोविड अहवाल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन, रुग्णांचे ओळखपत्र याची मागणी विक्री करते वेळी केली नसल्याचं समजतंय. 

याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यांमध्ये नांदेकर औषध निरीक्षक यांनी संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता, औषध व सौंदर्यप्रसाधने कायदे 1940 आणि जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. 

या हेल्पलाईनवर करा संपर्क 

रुग्णास औषधे छापील दरापेक्षा जास्त दराने विक्री होत असल्यास आणि औषधाचा काळा बाजार होत असल्यास या बाबतची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800 222 365 / 022- 26592362 या वर संपर्क साधावा असे आवाहन सह आयुक्त दक्षता सुनील भारद्वाज यांनी केले आहे.

संपादनः पूजा विचारे

mumbai covid 19 remdesivir book 7 people black marketing

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com