

Mumbai Crime
ESakal
मुंबई : प्रत्येक कुटुंबात भावंडांमध्ये वाद होतात, परंतु भावांमधील असाच एक वाद विकोपाला पोहोचल्याचे समोर आले आहे. मुंबईत विक्रोळी पार्कसाईट परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामध्ये तीन भावांमध्ये वाद होऊन दोन भावांनी एका भावाच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.