Mumbai Crime: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 24 तासात अटक!

Nalasopara Crime: पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाही
Mumbai Crime
Mumbai Crimesaka

Nalasopara Crime: शेजारी राहणाऱ्या 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलावून, तिच्यावर अतिप्रसंग करून, उत्तरप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या वासनाध आरोपीला 24 तासात बेड्या ठोकण्यात पेल्हार गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime : 'त्या' हत्येच्या गुन्ह्यांतील आरोपी पोलिसांनी 24 तासांत केले जेरबंद!

या आरोपी विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात कलम 376, 376 (अ)(ब) सह बाल लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल  करून त्याला अटक केले आहे. या आरोपीला आज वसई न्यायालयाने 12 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रामविलास बाबूलाल शाहू ( वय 37) असे अटक आरोपीचे नाव असून हा नालासोपारा येथील राहणारा असून, मूळचा उत्तर प्रदेश चा राहणारा आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime News: 3 पोलीस अधिकाऱ्यांनी मागितली लाच; गुन्हा दाखल!

5 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते 7 च्या दरम्यान या वासनाध आरोपीने आपल्या शेजारी राहणा-या 9 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केला होता.

याबाबत पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकुटी यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून, आरोपीच्या शोधासाठी गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना केले होते.या पथकाने घटनास्थळावरील पुरावे, मोबाईल।लोकेशन, बातमीदाराची माहिती यावरून आरोपी उत्तर प्रदेशाला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच 24 तासाच्या आत त्याला बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime News: 3 पोलीस अधिकाऱ्यांनी मागितली लाच; गुन्हा दाखल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com