
Mumbai Choreographer Arrested for Assaulting Female Dancer
Esakal
बॉलिवूडमध्ये डान्सर म्हणून काम करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना समोर आलीय. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय कोरिओग्राफरला अटक केलीय. ६ महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार पीडितेनं आता दाखल केलीय. पीडित तरुणी चित्रपट आणि स्टेज शोमध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करते. तर आरोपी मालाडचा असून तो डान्स कोच आणि इव्हेंट ऑर्गनायजर आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलीय.