
Mumbai: सायबर भामट्यांनी शहरातील दोन सुशिक्षित, सेवानिवृत्त महिलांसह तिघांना आर्थिक गैरव्यवहारांत सहभाग असल्याची भीती घालत, त्यांना गृहअटकेत ठेवल्याचा आभास निर्माण करीत तब्बल तीन कोटींहून अधिक रक्कम उकळल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) २२ डिसेंबर ते २ जानेवारी या काळात गुन्हे दाखल झाले आहेत.
फसवणूक झालेल्या पहिल्या तक्रारदार सेवानिवृत्त प्राध्यापक असून त्यांचे पती आयकर विभागात सहआयुक्त म्हणून निवृत्त झाले. त्यांच्या ३० वर्षांच्या मुलाला भामट्यांनी लक्ष्य केले. हा मुलगा बहुराष्ट्रीय कंपनीत उपाध्यक्ष म्हणून नोकरी करतो.