Mumbai Crime : सावत्र वडिलांकडून आपल्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण; नालासोपाऱ्यातून मुलाची सुटका

पहिल्या पत्नीसोबत झालेल्या वादामुळे सावत्र वडिलांनी 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना बुधवारी गोवंडीत घडली होती.
kidnapped
kidnappedsakal
Summary

पहिल्या पत्नीसोबत झालेल्या वादामुळे सावत्र वडिलांनी 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना बुधवारी गोवंडीत घडली होती.

मुंबई - पहिल्या पत्नीसोबत झालेल्या वादामुळे सावत्र वडिलांनी 6 वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याची घटना बुधवारी गोवंडीत घडली होती. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून नालासोपारा येथून या मुलाची सुटका केली आहे. गुलाब नबी बेग असे 23 वर्षीय आरोपी सावत्र पित्याचे नाव असून तो नालासोपारा येथे वास्तव्यास आहे.

अपहरण झालेल्या मुलाच्या आईसोबत आरोपीचा पहिला विवाह झाला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून दोघेही वेगळे राहत होते. त्यानंतर आरोपीने दुसरा विवाह केला होता. असे असताना काही महिन्यांपासून आरोपी पहिल्या पत्नीसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे त्याने तिला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्याने पीडित मुलाला खाऊचे अमिश दाखवले आणि त्याचे बुधवारी अपहरण केले. मुलगा सापडत नसल्याने त्याच्या आईने वाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तत्काळ अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. याचदरम्यान सावत्र वडिलांनीच मुलाचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी नालासोपारा येथे जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. तापासात त्याने मुलाला नालासोपारा पश्चिम येथे सोडल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शोध घेऊन मुलाला ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com