पोलिसांच्या कृतीमुळे जीवन संपवावे लागले; मृतक सिएचा मृत्युपुर्व चिठ्ठीत आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

४५ वर्षीय चिराग विरेया या सनदी लेखपालाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मृत्यूपुर्व चिठ्ठी मिळाली आहे.

Mumbai Crime : पोलिसांच्या कृतीमुळे जीवन संपवावे लागले; मृतक सिएचा मृत्युपुर्व चिठ्ठीत आरोप

मुंबई - ४५ वर्षीय चिराग विरेया या सनदी लेखपालाच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना मृत्यूपुर्व चिठ्ठी मिळाली आहे. मला पोलिसांनी खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, पोलिसांच्या लोभी वृत्तीमुळे मला आत्महत्या करावी लागली असा आरोप मृतकाने चार पानाच्या कथित चिठ्ठीत केला आहे. या चिठ्ठीवरील हस्ताक्षर जुळवण्याची प्रक्रीया सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी मला, माझ्या सहकाऱ्यांना त्रास दिल्याचा उल्लेख या चिठ्ठीत करण्यात आला आहे. या चिठ्ठीचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगीतले.

५०० पेक्षा अधिक लोकांचे जीवन माझ्यावर अवलंबून होते. मी १०० वर्षे आयुष्य जगू शकलो असतो,मात्र पोलिसांच्या खोट्या कारवाईमुळे मला माझे जिवन संपवावे लागले. पोलिस उपायुक्तांना ही चिठ्ठी लिहीली आहे. मात्र या चिठ्ठीत एकाही पोलिस अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नाही. ज्या महिलेने आणि तिच्या पतीने माझ्यावर बलात्काराचा खोटा आरोप केला. त्यांनी शक्य झाल्यास माझ्या गुंतवणूकदारांचे पैसै परत करावे, जीवनाच्या शेवटच्या क्षणाला मी खोट बोलणार नाही अस या चिठ्ठीत लिहीण्यात आले आहे.

बलात्काराच्या प्रकरणात भांडूप पोलिसांनी विरैया यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता. पोलिस ठाण्यात चौकशी झाल्यानंतर 30 जानेवारीला विरेया यांनी नाशिकच्या इगतपूरी येथील मित्राच्या फॉर्महाऊसवर फाशी घेवून आत्महत्या केली होती.