Mumbai Crime : माजी महापौरांच्या नावाचा गैरवापर ; लाखो रुपये उकळले !

Mumbai Crime News
Mumbai Crime Newsesakal

Mumbai Crime : नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक यांच्या नावाचा वापर करून एका व्यक्तीने मुरबाड येथील व्यावसायिकांकडून सहा लाख रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुरबाड पोलिस ठाण्यात याबाबत अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या नावाचा वापर करून असे प्रकार इतर भागांतही झाले असण्याची शक्यता असल्याने सागर नाईक यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त आणि कोपरखैरणे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी त्यांनी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

मुरबाड येथे राहणारे मोहन सासे यांचा बांधकाम साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय आहे. ७ सप्टेंबरला सागर नाईक यांच्या नावाने एका व्यक्तीने त्यांना फोन केला होता. तसेच त्यांना रेती आणि खडीपुरवठा करण्याबाबत कोटेशन देण्यास सांगितले होते.

Mumbai Crime News
Satara गादीसाठी BJP मेगाप्लॅन, Sharad Pawar यांचा शिलेदार पडणार का?

सासे यांनी ते त्या व्यक्तीला पाठवले. त्यानंतर त्याने हे कोटेशन मंजूर झाल्याचे सांगून त्याचे खरेदी आदेश काढण्याचे आश्वासन देऊन त्यांना सहा लाख रुपये त्यांच्या कंपनीच्या बँक खात्यात पाठविण्यास सांगितले.

त्यानुसार सासे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याने दिलेल्या बँकेच्या खात्यात सहा लाख रुपये पाठवले. मात्र, सासे यांना कामाची ऑर्डर न मिळाल्याने त्यांनी सागर नाईक यांच्या नावाने संपर्क साधलेल्या मोबाईलवर फोन केला. तो मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले.

Mumbai Crime News
Vaibhav Naik : ..म्हणून शिंदे गटाचे 'ते' 16 आमदार अपात्र होणार; सुप्रीम कोर्टाचा दाखला देत नाईकांचं स्पष्टीकरण

त्यानंतर सासे यांनी मुरबाड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. मात्र, सागर नाईक यांच्या नावाचा वापर करून काही व्यक्तींकडून व्यवसायात भागीदारी करण्याचे अथवा नवे कंत्राट देण्याच्या बहाण्याने पैसे उकळले जात असल्याचे नाईक यांना समजल्यानंतर त्यांनी नवी मुंबईच्या पोलिस आयुक्तांकडे व कोपरखैरणे पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

माजी महापौर सागर नाईक यांनी काही दिवसांपूर्वी पत्र दिले असून त्यानुसार केलेल्या तपासात नवी मुंबईत त्यांच्या नावाचा वापर करून फसवणुकीचा प्रकार घडलेला नाही. हा प्रकार मुरबाड येथे घडला आहे.

- अजय भोसले, वरिष्‍ठ पोलिस निरीक्षक, कोपरखैरणे पोलिस ठाणे

Mumbai Crime News
Mansi Naik Dance: नागपंचमीच्या निमित्तानं मानसीचा नागीन डान्स, तुम्हीही म्हणाल!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com