

Kalachowki attack lover kills himself
ESakal
प्रेयसीसोबतच्या ब्रेकअपमुळे नाराज असलेल्या एका २४ वर्षीय बेरोजगार तरुणाने रक्तरंजित खेळ खेळला. तरुणाने आपल्या प्रेयसीचा गळा सार्वजनिक ठिकाणी चिरला आणि तिच्यावर अनेक वेळा चाकूने वार केले. एवढेच नाही तर त्याने मुलीवर हल्ला केल्यानंतर त्यानेही आत्महत्या केली. रस्त्याच्या मधोमध घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. परिसरात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.